आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठीची नोंदणीची मुदत संपण्याला थोडाच अवधी उरला आहे. त्यात अजूनही आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी उत्पादकतेच्या मर्यादित सुधारणा झाली नाही.
Chana Market News छत्रपती संभाजीनगर : आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठीची (Chana Procurement) नोंदणीची मुदत संपण्याला थोडाच अवधी उरला आहे. त्यात अजूनही आधारभूत किमतीने (Chana MSP Procurement) हरभरा खरेदीसाठी उत्पादकतेच्या मर्यादित सुधारणा झाली नाही.
तसेच ई-पीक पाहणीची अडचण आणि खरेदी केंद्रांची वानवा अडचणींची ठरण्याची शक्यताच जास्त आहेत
आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचा सुरुवातीला दोन तीन दिवस घोळ झाला. १५ मार्चपर्यंत नोंदणीची मुदत आहे, त्यानंतर खरेदी सुरू होणार आहे.
त्यानंतर कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार रब्बी हंगाम २०२२-२३ साठी हरभरा खरेदी करता हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास १५ लाख हेक्टर वर हरभऱ्याचे पीक आहे.
या पिकातून प्रत्यक्ष येणारे उत्पादन व जाहीर उत्पादकतेचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आपला हरभरा आधारभूत किमतीपेक्षा बाजारात मिळणाऱ्या कमी दरानेच विकण्याची वेळ येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro