Ticker

6/recent/ticker-posts

Summer Heat : यंदाचा फेब्रुवारी १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण

Summer Heat : यंदाचा फेब्रुवारी १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण

यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली. सूर्य चांगलाच तळपल्याने यंदाचा फेब्रुवारी महिना १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण ठरला आहे.
Weather Update पुणे : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल (Summer Season) लागली. सूर्य चांगलाच तळपल्याने यंदाचा फेब्रुवारी महिना १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण (Hot Summer) ठरला आहे. या फेब्रुवारीत देशात सरासरी २९.६६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

सरासरीपेक्षा अधिक, किमान तापमानातही यंदाचा फेब्रुवारी आतापर्यंतच्या पाचव्या स्थानावर असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) स्पष्ट केले आहे.
यंदा फेब्रुवारीत देशामध्ये २९.६६ अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापमान, तर १६.३७ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमान नोंदविले गेले आहे.

१९८१ ते २०१० या तीस वर्षांतील सरासरी तापमानाचा विचार करता फेब्रुवारी महिन्याचे कमाल सरासरी तापमान २७.८० अंश तर किमान सरासरी तापमान १५.४९ अंश सेल्सिअस आहे.

या तुलनेत यंदा कमाल तापमानात १.८६ अंश सेल्सिअस तर किमान तापमानात ०.८८ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
१९०१ पासूनचे १२३ वर्षांमधील कमाल तापमान विचारात घेता, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक २९.६६ अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापमान नोंदले गेले आहे.

यापूर्वी २०१६ च्या फेब्रुवारीत सरासरी २९.४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर या १२२ वर्षांतील सरासरी पेक्षा अधिक किमान तापमानाचा विचार करता यंदाचा फेब्रुवारी पाचव्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १६.८२ अंश सेल्सिअस, तर २००६ मध्ये चौथ्या क्रमांकाच्या सरासरीपेक्षा अधिक किमान १६.४२ अंश तापमानाची नोंद झाली होती.
धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या