प्रत्येक बाजार समितीत निवडून द्यावयाच्या १८ संचालकांसाठी एकूण २० हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत.
Amravati News : जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Election) मतदारांची अंतिम यादी सोमवारी (ता. २०) जाहीर करण्यात आली.
प्रत्येक बाजार समितीत निवडून द्यावयाच्या १८ संचालकांसाठी एकूण २० हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अमरावतीसह धामणगावरेल्वे, दर्यापूर, अचलपूर, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, नांदगावखंडेश्वर, मोर्शी, अंजनगावसुर्जी, वरुड, तिवसा व धारणी या बाजार समितीच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ३० एप्रिलपर्यंत घेणे आवश्यक आहेत. त्या दृष्टिकोनातून निवडणूकपूर्व कार्यक्रम आता आटोपला आहे. आक्षेप व सुनावणी अंतिम मतदारांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली आहे.
प्रत्येक बाजार समितीत १८ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अकरा, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, व्यापारी-अडतेमधून दोन व हमाल-मापारी मतदारसंघातून एका संचालकाचा समावेश आहे.
अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने आता सहकार क्षेत्रातील धुरिणांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे. राज्य निवडणूक प्राधिकरण त्यासाठी येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असून कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro