केंद्र शासनाने रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे करणे कृषी केंद्रचालकांना बंधनकारक केले आहे.
Bhandara News : केंद्र शासनाने रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे करणे कृषी केंद्रचालकांना बंधनकारक केले आहे.
पण यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्रचालकांनी ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करून कायद्याचे उल्लंघन केले आहे, अशा कृषी केंद्रचालकांची सुनावणी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित केले.
कृषी केंद्रचालक नियमांचे कटाक्षाने पालन करीत आहेत किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी धडक मोहीम जिल्हा व तालुका भरारी पथकाद्वारे राबविण्यात आली होती.
या तपासणी मोहिमेत परवाना दर्शनी भागात न लावणे साठा व दर फलक ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, पॉस मशिनप्रमाणे प्रत्यक्ष साठा जुळत नसणे, साठा पुस्तक अद्ययावत नसणे, शेतकऱ्यांना एम फॉर्मची व पॉस मशिनची पावती न देणे, खत कंपन्यांचा परवान्यात समावेश असणे, खरेदी केलेल्या खताची साठा पुस्तकात नोंद नसणे शेतकऱ्यांची सही नसणे, पॉस मशिन बंद असणे, अनुदानित खताची ऑफलाईन पद्धतीने विक्री करणे या बाबी आढळून आल्याने जिल्ह्यातील १२ कृषी केंद्रचालकांचे खत विक्री परवाने निलंबित केले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा डॉ. अर्चना कडू यांनी कळविले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro