Ticker

6/recent/ticker-posts

Cashew Rate : काजू बीच्या दरात घसरण सुरूचप्रतिकिलो ११५ रुपये दर; बागायतदार हतबल

Cashew Rate : काजू बीच्या दरात घसरण सुरूच
प्रतिकिलो ११५ रुपये दर; बागायतदार हतबल
सिंधुदुर्गनगरी ः काजू बीच्या दरात (Cashew Rate) आता प्रतिकिलो ५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे काजू बी (Cashew seeds) चा दर आता प्रतिकिलो ११५ रुपयांपर्यंत घसरला आहे. सततच्या दर घसरणीमुळे काजू बागायतदार हतबल झाले आहेत.
काजू हंगाम सुरू होऊन महिना-दीड महिना झाला आहे. सुरुवातीला बांदा (ता. सांवतवाडी) काजू बीचा दर प्रतिकिलो १२० होता. परंतु हंगाम सुरू होऊन दोन ते तीन आठवडे झाले तरी अपेक्षित काजू बी बाजारपेठेत आली नाही.

त्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली. पहिल्यांदा प्रतिकिलो ५ रुपयांनी वाढ झाली त्यानंतर पुन्हा पाच रुपये वाढ झाली त्यामुळे काजू बीचा दर प्रतिकिलो १३० रुपयांवर पोहोचला.
काजुच्या दरात वाढ झाल्यामुळे काजुचा दर प्रतिकिलो १४० पर्यंत जाईल, अशी आशा होती. परंतु दहा बारा दिवसांपासून काजू बीची आवक मोठ्या प्रमाणात झाली.

त्यामुळे काजू बीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यातदेखील काजू बी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात आली. त्यामुळे आणखी पाच रुपयांनी दर घसरला.

तेवढ्यावरच न थांबता या आठवड्यातदेखील ५ रुपयांनी दर घसरल्यामुळे सध्या व्यापारी ११५ रुपयांनी काजू बी खरेदी करीत आहेत. काजू बीच्या दरात सतत घसरण होत असल्याने काजू उत्पादक शेतकरी हतबल आहे.
काजू बीला प्रतिकिलो किमान १४० ते १५० रुपये दर मिळाला पाहीजे. काजू बीचा उत्पादनखर्च १२० रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने सध्या बाजारपेठेत काजू खरेदी केला जात आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- प्रकाश पांचाळ, काजू उत्पादक शेतकरी, कोकिसरे, ता. वैभववाडी.
कारखानदार आणि व्यापारीच दर ठरवितात
काजू बीचा दर ठरविणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. काजू बीचा दर कारखानदार आणि व्यापारीच ठरवित असतात. त्यामध्ये काजू बागायतदारांचा विचार अजिबात केला जात नाही.

त्यामुळे शासनाने काजू हमीभावाबाबत विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या