शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. दीड महिन्यापूर्वीच दुबार भाताची लावणी करण्यात आली आहे.
रसायनी, जि. रायगड : काही दिवसांपासून हवामान बदलामुळे (Change Weather) तापमानात वाढ झाली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरात दुबार भातपिकाला सध्याच्या खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.
परिसरात पाताळगंगा नदीच्या काठच्या गावातील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याचा; तसेच माणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचा जांभिवली पंचक्रोशीत आणि मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा आधार आहे.
शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. दीड महिन्यापूर्वीच दुबार भाताची लावणी करण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामात अवनी, रत्ना याशिवाय इतर संकरित जातीच्या वाणांचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. सुरुवातीला बियाणे पेरणीनंतर रोपांच्या वाढीसाठी थंडीचे अनुकूल वातावरण होते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro