मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६२ कारखान्यांनी यंदाच्या ऊसगाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे.
Sugarcane Crushing Season छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६२ कारखान्यांनी यंदाच्या ऊसगाळप हंगामात (Sugarcane Crushing Season) सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी ८ कारखान्यांचा गाळप हंगाम गुंडाळला आहे.
सहभागी कारखान्यांनी ९ मार्चअखेर २ कोटी १२ लाख ४१ हजार १५५ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील ज्या ६२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये धाराशिवमधील १३, छत्रपती संभाजीनगर व परभणीमधील प्रत्येकी ७, जालन्यातील ५, बीडमधील ८, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ व लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश आहे.
या कारखान्यांपैकी ९ मार्चअखेर ८ कारखान्यांचा गाळप हंगाम गुंडाळला आहे. त्यामध्ये हिंगोली व लातूरमधील प्रत्येकी एक, नांदेडमधील २, तर धाराशिवमधील ४ कारखान्यांचा समावेश आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro