Ticker

6/recent/ticker-posts

Onion rate : कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी डाव खेळलाय का?

Onion rate : कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी डाव खेळलाय का?
दुसरे, जाहीर झालेल्या अनुदानाचे पैसे कोणाला मिळणार? कसे मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्यांना मिळणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

Onion Rate : ज्यावेळी कांद्याचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली घरसरतात. तेव्हा शासनाची काय जबाबदारी बनते. तर कांद्याला 300 रुपये अनुदान देण्याऐवजी कांद्याचा किमान उत्पादन खर्च ठरवून त्या खर्चाच्या खाली कांदा विक्री-खरेदी न करण्याचे बंधन टाकायला हवे.

तरच शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनाची आणि विक्रीची शाश्वती निर्माण होईल.

मुळात हे 300 रुपये अनुदान अतिशय तुटपुंजे आहे. सर्वसाधारणपणे 1 क्विंटल कांदा उत्पादन घेण्यासाठी किमान 1000 ते 1200 रुपये खर्च येतो. (एक किलो कांदा पिकवण्यास 10/12 रुपये).

यावर शासनाने उपकार केल्याप्रमाणे 300 रुपये अनुदान जाहीर केलं आहे. अर्थात शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेण्यासाठी जी गुंतवणूक केली आहे, त्याच्या 50 टक्के रक्कम देखील देण्यास तयार नाही.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या