Ticker

6/recent/ticker-posts

Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान

Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान

वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
Pune News : तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (ता. सायंकाळी व रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नव्याने लागवड केलेला कांदा व काढणी (Onion harvesting) केलेल्या कांद्याचे, तसेच काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान (Wheat Loss) झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

तसेच मोहोर गळाल्याने आंब्याचेही नुकसान होणार आहे. वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
धामणी, जारकरवाडी, वैदवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव, खडकवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक परिसरात सोमवारी (ता.६) सायंकाळी व रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही गावांत गाराही पडल्या.
सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांची धांदल उडाली काहींनी प्लॅस्टिक कागदाने कच्चा विटा झाकण्याचा प्रयत्न केला, तरीही काही प्रमाणात मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटून गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती वैदवाडी येथील वीटभट्टी व्यावसायिक ज्ञानेश्‍वर दरेकर यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या