Ticker

6/recent/ticker-posts

Onion Rate : कांद्यापोटी दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्यांचे उपोषण, आश्‍वासनानंतर मागे

Onion Rate : कांद्यापोटी दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्यांचे उपोषण, आश्‍वासनानंतर मागे

सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्री केल्यानंतर सर्व खर्च वजा करून अडत व्यापाऱ्याने चव्हाण यांना दोन रुपयांचा धनादेश दिला होता.

Onion Rate News बार्शी, जि. सोलापूर ः शेतकऱ्यांना कांद्यासाठी हमीभाव (MSP For Onion) मिळावा, कमी भावाने विकलेल्या कांद्याचे अनुदान (Onion Subsidy) मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी बोरगाव झाडी (ता. बार्शी) येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी तहसील कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण (Farmer Hunger Strike) आमदार राजेंद्र राऊत यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेतले.
सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्री केल्यानंतर सर्व खर्च वजा करून अडत व्यापाऱ्याने चव्हाण यांना दोन रुपयांचा धनादेश दिला होता. तो पंधरा दिवसांनी खात्यावर जमा होणार आहे.
चव्हाण यांच्या समवेत यशवंत कोकाटे, दादासाहेब शेळके, बाबा बोधले यांनीही उपोषणास बसून पाठिंबा दिला होता. पण दोन दिवसांनंतर उपोषणस्थळी आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कांदा पिकाची माहिती देणार आहोत. तसेच दोन रुपयांच्या पट्टीच्या विषयाबाबत बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या