Ticker

6/recent/ticker-posts

भूषण कासलीवाल यांच्या हस्ते मुर्डेश्वर महादेव मंदिराच्या येथील कामांचे उद्घाटन

भूषण कासलीवाल यांच्या हस्ते मुर्डेश्वर महादेव मंदिराच्या येथील कामांचे उद्घाटन…



काजीसांगवी : (उत्तम आवारे) चांदवड येथील मुर्डेश्वर महादेव मंदिर वरचे गाव येथे आज भौतिक सुख सुविधा कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला असून यावेळी सभामंडप शेड व पेवर ब्लॉक अशी कामे होणार असल्याची माहिती भूषण कसलीवाल प्रथम नगराध्यक्ष चांदवड यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महेश बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण कासलीवाल यांनी कामासाठी का वेळ लागला हे सर्वांना माहितीच आहे परंतु वेळ का लागला आहे याचे काय कारण असू शकते हे देखील  आपल्या भाषणात नागरिकांना समजाऊन सांगितले. कोरोना काळामध्ये मंजूर झालेले काम असून हा निधी आज अखेर वर्ग झाला आहे. चांदवड शहरांमध्ये प्रशासन आहे तसेच राज्य सरकार देखील काही वर्षांमध्ये बदलले आहे त्यामुळे या सर्व कामांना अडथळा झाला असून असे अनेक कामे प्रलंबित आहे. मागील शासनाने निधीदेखील थांबवला होता यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. परंतु आता केंद्रीय राज्य मंत्री भारतीताई पवार व आमदार डॉ. राहुल आहेर तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने आणि माझ्याकडून यापुढे चांदवड शहराचा विकास हा झपाट्याने होत असताना दिसून येईल व नागरिकांनी दिलेले आशीर्वाद हे मला बळ देतील असेही भूषण कासलीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले.


यावेळी चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल , मंदिराचे अध्यक्ष संतोष सोनवणे,भाजपा ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे,चंद्रकांत सोनाजे,सोनू पवार,सुभाष कोल्हार,सुरेश जाधव, मक्सुद घासि,अंकुर कासलीवाल,महेंद्र कर्डिले,किशोर शत्रिय,पप्पू भालेराव,किशोर बिरारी, राजेंद्र देवरे,मनोज बर्वे,महेश बोराडे,वर्धमान पांडे,महेश खंदारे,पुरोहित किशोर हरदास, पिंटू राऊत,गोकुळ रहाणे,मुर्डेश्वर महादेव भक्त परिवार व त्रिलोक मित्र मंडळ तसेच अनेक महिला व नागरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या