Ticker

6/recent/ticker-posts

Crop Damage : सात जिल्ह्यांत नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार हेक्टरवर

Crop Damage : सात जिल्ह्यांत नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार हेक्टरवर
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील ९६ हजार ९३४ शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार ५७३.१८ हेक्टरवर पोहोचले आहे.
Crop Damage Update छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वादळी पावसाने (Unseasonal Rain) रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान (Rabi Crop Damage) शनिवारी (ता. १८) ही सुरूच ठेवले.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील ९६ हजार ९३४ शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार ५७३.१८ हेक्टरवर पोहोचले आहे.
मराठवाड्यातील विविध भागात १४ मार्चपासून वादळी पावसाचे आक्रमण सुरू आहे. विजांचा कडकडाट, वादळ व गारपीटसह पडणाऱ्या वादळी पावसाने काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळ पिकांचे व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले व करतो आहे.

प्रशासनाच्या १९ मार्च अखेरच्या प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३१४ शेतकऱ्यांचे ७७६२.५० हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले आहे.
याशिवाय जालना ११६३३ शेतकऱ्यांचे १९ हजार ५३ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा प्रकोप जास्त असून या जिल्ह्यातील १९८९९ शेतकऱ्यांचे २३ हजार ५५४ हेक्टर, परभणी मधील ४५०० शेतकऱ्यांचे २४०० हेक्टर, हिंगोलीतील १३२८६ शेतकऱ्यांचे ५६०४ हेक्टर, बीडमधील २१४५९ शेतकऱ्यांचे ११३६५ हेक्टर,

लातूरमधील १६८४२ शेतकऱ्यांचे ११७९४.८० हेक्टर क्षेत्राचा समावेश समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नुकसान झालेल्या ७७,५७३.१८ हेक्टर क्षेत्रामध्ये ४७३३६ हेक्टर जिरायत, २४ हजार ७४३ हेक्टर बागायत तर ५४३२ हेक्टर फळ पिकांचा समावेश आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या