Ticker

6/recent/ticker-posts

रूपाली शेटे यांना नारीशक्ती सन्मान

रूपाली शेटे यांना नारीशक्ती सन्मान


 दि.16 वार्ताहर :- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व नाशिक परिसर साप्ताहिक च्या वतीने दिला जाणारा नारीशक्ती सन्मान पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्त्या रूपाली शेटे यांना प्रांत ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

रूपाली शेटे या सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा च्या महिला प्रवक्ता तसेच नेहरू युवा केंद्र युवा राष्ट्रीय स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील जनजागृती कार्यक्रम, युवक युवतींना संधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण व सामाजिक उत्थानासाठी प्रयत्न केले आहेत. याची दखल घेऊन हा पुरस्कार देत असल्याचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या नाशिक विभाग प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदि यांनी सांगितले. प्रसंगी व्यासपीठावर प्रांत ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा दराडे, माजी नगराध्यक्ष उषा शिंदे, ब्रह्मकुमारी वासंती दीदी, ब्रह्मकुमारी नीता दीदी, राजयोगिनी अनु दीदी, साप्ताहिक नाशिक परिसर चे ब्रह्मकुमार दिलीप बोरसे, प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या