अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी तालुक्यात पावसाने कहर केला आहे. पावसाने आत्तापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे.
आटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी तालुक्यात पावसाने कहर केला आहे. पावसाने आत्तापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे. अतिपावसामुळे तालुक्याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून शेतीच्या इतिहासात यावर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तीन महिन्यांपासून तालुक्यात सतत कमी अधिक पाऊस पडत आहे. दीड महिन्यापूर्वी सलग एक महिनाभर सूर्याचे दर्शन झाले नव्हते तर चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अवर्षणप्रवण असलेल्या आटपाडीत विक्रमी ५५४ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. सारया गावचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अनेक गावचे अनेक पूल पाण्याखाली गेले असून वाहून गेले आहेत. या पावसाने मोठे नुकसान केले आहे. कौठूळी येथील किरण कदम यांची ओढ्यालगत डाळिंबाची बाग आहे. चार महिने बागेला हंगाम धरून झाले होते. ओढ्याला प्रचंड आलेले पाणी बागेत शिरले आणि डाळिंबाची झाडे पाण्याच्या प्रवाहाने उन्मळून पडली आहेत. त्यांचा या वर्षीचा हंगाम वाया गेला आहेच शिवाय डाळिंबाची पूर्ण भाग उद्ध्वस्त झाली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro