१. भाग्यश्री -
या जातीच्या फळांत लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून,बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत.या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते.
२. धनश्री -
फळे मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
३. राजश्री-
फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरीत वाणाचे उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
४. फुले राजा -
फळे नारंगी, लाल रंगाची असतात. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रतिहेक्टर मिळत
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro