आले पिकाच्या दरात मागील दोन महिन्यांपासून सुधारणा झाली आहे. परिणामी आले बियाण्याचे दरही सुधारले आहेत. मागील पंधरा दिवसांत प्रति गाडी सात ते आठ हजार रुपयांनी दरात सुधारणा झाली आहे
Ginger Market Update सातारा ः आले पिकाच्या दरात (Ginger Rate) मागील दोन महिन्यांपासून सुधारणा झाली आहे. परिणामी आले बियाण्याचे दरही (Ginger Seed Rate) सुधारले आहेत. मागील पंधरा दिवसांत प्रति गाडी सात ते आठ हजार रुपयांनी दरात सुधारणा झाली आहे.
सध्या धुणीचा (खाण्यास लागणारे) प्रति गाडी २८ ते २९ हजार रुपये तर आले बियाण्याचा ३२ ते ३४ हजार रुपये दर निघत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
आले व आले बियाण्याचा दर सुधारणार असल्याने नवीन आले लागवडीचा भांडवली खर्चात मोठी वाढ होणार असली तरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आले लागवडीच्या दृष्टिने शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. आले धुणीच्या दरात दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याने बियाण्याच्या दरातही सतत बदल होऊ लागला आहे.
आले लागवडीपूर्वी आले बियाणे ढेप लावून ठेवला बंदीस्त करून सावलीत ठेवले जाते. यासाठी बियाणे एक ते दीड महिना अगोदर खरेदी करावे लागते. सध्या लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे.
आले पिकाच्या दरात मागील पंधरा दिवसांत सात ते आठ हजार रुपये सुधारणा झाली आहे. मागील चार वर्षांत आले पिकाच्या दराने नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर दिवाळीपासून दरात संथगतीने का होईना सुधारणा होऊ लागली. जानेवारीत प्रति गाडी १५ ते १८ हजार रुपयांवर दर गेले होते.
मार्चच्या सुरुवातील २० ते २२ हजार रुपये दर मिळाले होते. मागील दहा दिवसांपासून धुणीचा (खाण्यास लागणारे) आले पिकाच्या दरात सुधारणा होत गेली. सध्या प्रति गाडी (५०० किलो) २८ ते २९ हजार रुपये दर मिळत आहे.
या दराच्या तुलनेत बियाण्याचे दर तीन ते चार हजार रुपये जास्तीचा निघतो. त्यामुळे सध्या बियाण्याचे दर ३२ ते ३४ हजार रुपये प्रति गाडीस निघाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro