Ticker

6/recent/ticker-posts

तंत्र कांदा साठवणुकीचे व चाळ बांधणी

तंत्र कांदा साठवणुकीचे... डॉ. विजय महाजन जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते. खरिपाचा नवीन कांदा ऑक्‍टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खरी साठवण ही रब्बी कांद्याची करावी लागते. ही साठवण फायदेशीर ठरते. स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्‍यक आहे. साठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन : जातीची निवड : खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडतो. एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. खते आणि पाणी नियोजन : खतांची मात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होतो. शक्‍य होईल तितके नत्र सेंद्रिय खतामधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते. रब्बी कांद्यासाठी पालाशची मात्रा वाढवावी. गंधकासाठी अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे साठवण चांगली होण्याची आवश्‍यक आहे. पाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी; परंतु नियमित लागते. कंद पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते. काढणीअगोदर २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. कांदा साठवणीत चांगले टिकण्यासाठी काढणीपूर्वी सल्यानुसार योग्य उपाययोजना करावी. कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. 

 साठवणुकीसाठीचे नियोजन : 
कांदा सुकवणे : काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो. बऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात. साठवणगृहातील वातावरण : चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.

साठवणगृहाची रचना : साठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे. नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी. चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी. चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. कौल महाग पडतात. चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.   साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी : चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा 4जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. चाळीची उ सूण संशोधन केंद्राने भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राच्या मदतीने कांद्यावर विकिरणांचा वापर करून ते शीतगृह व नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळीत ठेवून प्रयोग केले. विकिरण प्रक्रिया केल्यामुळे कांद्याला कोंब फुटले नाहीत. शीतगृहातून बाहेर काढल्यानंतरदेखील त्यांना कोंब फुटले नाहीत. त्यांच्या वजनात जरासुद्धा घट झाली नाही. शीतगृहातील साठवणीचा खर्च जास्त येतो. निर्यातीसाठी किंवा बियाण्यासाठी लागणाऱ्या कांद्याची साठवण शीतगृहात करणे परवडू शकेल.



 - डॉ. विजय महाजन संपर्क : ०२१३५ - २२२०२६ (लेखक राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.) स्तोत्र /

Source : ॲग्रोवन ​​​​​​​​​​​​​​​​||अन्नदाता सुखी भवः ||​​​​​​​​​​​​​​​​ ​​​​​​​​​​​​​​​​🌾होय आम्ही शेतकरी 🌾​​​​​​​​​​​​​​​​ ​​​​​​​​​​​​​​​​​​



चाळ बांधणी



kanda,कांदा साठवणुक,onion,paj,April,कृषीन्यूज.com,krushi,krushi news,krushinews,

पूर्वनियोजन

  • कांदा चाळीसाठी उंचावरील किंवा माथ्यावरील जेथे पाणी साठणार नाही, तसेच वाहतुकीसाठी सोयीची अशीच जागा निवडावी.
  • कांदा चाळीची लांबी ही नेहमी वाऱ्याच्या दिशेला काटकोनात छेदणारी म्हणजे दक्षिणोत्तरच असावी.
  • कांदा चाळीच्या वर-खाली तसेच दोन्ही बाजूंनी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  • कांदा चाळीच्या आजूबाजूला वारा अडवणारे कोणतेही बांधकाम नसावे.
  • थंड तापमानात कांद्याचा साठवण काळ वाढतो, यासाठी झाडांची सावली असेल तर फायद्याचे ठरते.

चाळ बांधणी

  • कांदा चाळीचा पाया हा जमिनीपासून 1.5 ते 2 फूट उंच ठेवावा. यासाठी सिमेंटचे, लोखंडाचे किंवा लाकडी 1.5 ते 2 फूट उंचीचे कांदा चाळीचा भार पेलू शकणारे खांब समान अंतरावर उभारावेत, त्यावर कांदाचाळ बांधावी.
  • 25 मे. टन क्षमतेसाठी 12 मीटर लांब व 3.60 मीटर रुंद या आकाराची चाळ असावी.
  • 3.60 मीटर रुंदीचे 1.20 मीटरचे तीन समान हिस्से करावेत. कडेच्या दोन्ही हिश्‍श्‍यांमध्ये का ंद्याची साठवण करावी व मधला हिस्सा हवा खेळती राहण्यासाठी रिकामाच ठेवावा.
  • 12 मीटर लांबीचे 3.00 मीटरचे चार समान कप्पे करावे. म्हणजेच दोन्ही बाजूंचे प्रत्येकी चार असे एकूण आठ कप्पे होतील, यामध्ये कांदे साठवावेत.
  • छपराला आधार देण्यासाठी सिमेंट किंवा लोखंडी खांब किंवा लाकडी बांबू समान अंतरावर रोवावेत.
  • पायापासून 1.80 मीटर एवढी चाळीची उंची असावी. त्यावर दोन्ही बाजूंना 0.80 - 1.0 मीटरचा उतार निघेल अशा प्रकारचे छप्पर टाकावे.
  • छपरासाठी मंगळुरी कौले सर्वांत उत्तम पण सिमेंटचे पत्रे वापरण्यास हरकत नाही.
  • कडेच्या भिंती या लाकडी फळ्यांच्या (कमाल पाच सें.मी. रुंद) किंवा बांबूच्या असाव्यात दोन फळ्यांमधून कांदे बाहेर पडणार नाहीत. एवढे अंतर ठेवून फळ्या बसवाव्यात. भिंतीसाठी लोखंडाच्या जाळीचाही पर्याय होऊ शकतो.
  • छप्पर हे चाळीच्या दोन्ही भिंतीपासून एक मीटर बाहेरपर्यंत येईल एवढ्या रुंदीचे असावे.
  • उष्णतारोधक पदार्थ की उसाचे पाचट गव्हाचा कोंडा, सरमड किंवा वाळलेले गवत यांचा छपरावर थर द्यावा.

काही महत्त्वाच्या सूचना

  • कांदा चाळीमध्ये साठवण करावयाच्या कांद्याची काढणी कांदापात पूर्ण पडल्यानंतर म्हणजे कांदा पूर्णपणे तयार झाल्यानंतरच करावी.
  • प्रतवारीकरून कांदा चाळीत भरावा.
  • कांदा काढणी अगोदर जर पाऊस आला असेल तर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढणी अगोदर शिफारशीत बुरशीनाशक तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारावे.
  • कांदा काढणीनंतर सावलीमध्ये व्यवस्थित वाळवावा आणि मगच चाळीत साठवण करावी.
  • नैसर्गिकपणे हवा खेळती राहण्यासाठी चाळीची रुंदी प्रमाणातच असावी.
  • छरासाठी लोखंडी पत्रे वापरू नयेत.
  • पावसामध्ये वाऱ्याच्या दिशेकडील बाजू झाकण्याची व्यवस्था करावी.
  • याप्रकारे 25 टन क्षमतेची कांदा चाळ बांधण्यासाठी सर्वसाधारणपणे एक ते सव्वा लाख रुपये खर्च येतो, परंतु घरगुती पर्यायी वस्तू वापरून हा खर्च निम्म्यावर आणता येतो.
  • राष्ट्रीय फलोद्यान मंडळ व महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून कांदा चाळीसाठी अनुदान उपलब्ध आहे.

 

एस. बी. तांबे, 7588531906
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या