Ticker

6/recent/ticker-posts

Chana Procurement : परभणीत हमीभावाने हरभरा खरेदी दोन केंद्रांवर सुरू

Chana Procurement : परभणीत हमीभावाने हरभरा खरेदी दोन केंद्रांवर सुरू

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ केंद्रांवर ७ हजार ८१२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली.

Chana Market Update परभणी ः या वर्षीच्या (२०२२-२३) हंगामात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत (MSP Procurement Scheme) हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाने (नाफेड) मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सोमवार (ता. १३) पर्यंत १५ हजार ७२५ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.
सर्व केंद्रचालकांना खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी (ता. १४) परभणी आणि सोनपेठ येथील केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यातील केंद्रावर बुधवारी (ता. १५) हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या