Ticker

6/recent/ticker-posts

Heat Wave: उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी गव्हाची लवकर लागवड

Heat Wave: उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी गव्हाची लवकर लागवड

लवकर पेरणी केल्यामुळे या उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे शक्य होते. त्यामुळे यंदा गव्हासह प्रमुख रब्बी पिकांची लागवड लवकर सुरू झाली आहे.

रब्बीचा हंगाम (Rabbi Season) सुरू झाल्याने देशभरातील शेतकऱ्यांनी पेरणीची (Wheat Sowing) काम लवकर सुरू केली आहेत. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे (Climate Change) उष्णतेच्या लाटा (Heat Wave) येऊन पिकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होतोय. लवकर पेरणी केल्यामुळे या उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे शक्य होते. त्यामुळे यंदा गव्हासह प्रमुख रब्बी पिकांची लागवड लवकर सुरू झाली आहे. 
यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत 54 हजार हेक्टरवर गव्हाची लागवड झाली असून बहुतांश लागवड ही उत्तरप्रदेश मध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तिथे 34 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी उत्तरप्रदेशात खरीपाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात पावसाने ओढ दिली होती. तर सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत राज्यात अतिवृष्टी झाली. 
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी कृषी शास्त्रज्ञ एस के सिंग म्हणाले, "पावसाचं पाणी आटताच शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी सुरू केली आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाल्या झाल्याच पेरण्या सुरू झाल्यामुळे पिकं मार्च महिन्यात काढणीला येतील. म्हणजे हवामान बदलामुळे जे तापमान वाढतंय त्याचा फटका बसणार नाही. हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पेरण्या पूर्ण कराव्यात म्हणजे त्यांची पीक वेळेवर काढणीला येतील."

धन्यवाद
🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या