दंडेलशाहीने अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले पाणंद रस्तेही खुले झाले आहेत.
Satara Agriculture News ‘गाव करेल ते राव काय करेल’ या उक्तीची प्रचिती कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यात महाराजस्व अभियानातून (Maharajaswa Abhiyan) खुल्या करण्यात आलेल्या नकाशावरील पाणंद, शेती रस्त्यातून (Farm Road) आली आहे. गेली अनेक वर्षे बांधाला बांध असूनही एकमेकांचे तोंडही न बघणारे शेतकरी एकत्र आणण्यात या अभियानातून यश मिळाले आहे.
शेतात ये-जा करण्याबरोबरच काढणीयोग्य माल शेताबाहेर नेण्यासाठी पूर्वजांपासून पाणंद रस्ते आहेत. शासनाकडील नकाशावर त्याची नोंदही आहे; मात्र अनेक गावांतील शिवारात ते रस्ते अतिक्रमणात गेले,
त्यामुळे काहींनी न्यायालयात धाव घेतली, तर काहींनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. हेलपाटे घालून अनेकांनी आपले निम्म्याहून अधिक आयुष्य खर्ची घातले तरीही तो प्रश्न सुटला नाही.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro