आपल्या शेती तसेच आहारात ज्वारी, बाजरी व नाचणी ही पौष्टिक तृणधान्ये म्हणून ओळखली जातात. ही पिके विपरीत हवामान परिस्थितीतही तग धरून उत्पादन देतात.
Jowar Verities अकोला ः ज्वारी पिकाच्या (Jowar Crop) भारतभरात उपलब्ध २५ हजार जननद्रव्यांचा (जर्मप्लास्म- विविध गुणधर्मांचे पीकवाण वा प्रकार) संग्रह नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जिनोम संशोधन संस्था (National Institute of Plant Genome Research-एनपीजीआर) यांच्या साह्याने ‘पंदेकृवि’च्या वाशीम (PDKV Washim) येथील कृषी संशोधन केंद्रावर उपलब्ध केला आहे. त्यांची येथे लागवड (Jowar Cultivation) केली आहे. सध्या हे सर्व वाण बहरले आहे. सोमवारी (ता. १३) या ठिकाणी शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांचा मेळावा भरणार आहे.
पल्या शेती तसेच आहारात ज्वारी, बाजरी व नाचणी ही पौष्टिक तृणधान्ये म्हणून ओळखली जातात. ही पिके विपरीत हवामान परिस्थितीतही तग धरून उत्पादन देतात. त्यांच्यातील पौष्टिक पोषण मूल्यांमुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे.
येते दशक हे पर्यावरण बदलाचे असल्यामुळे अत्यंत तातडीने या पिकांना प्राधान्य देणे आवश्यक मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला आहे.
पौष्टिक तृणधान्यांची पोषणमूल्ये आजवर दुर्लक्षित राहिली. त्यामुळे जगभरात आपणास ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करण्याची वेळ आली.
केंद्र सरकारने या दृष्टीने पुढाकार घेऊन येत्या काळात आपणास पोषणयुक्त तृणधान्य कोठार असलेला देश बनविण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro