सौदे होऊनही बेदाणा खरेदीला ऐनवेळी नकार देणाऱ्या प्रकाराची राज्याचे उपसंचालक (पणन) अविनाश देशमुख यांनी दखल घेतली आहे.
Raisin Market Update सोलापूर ः सौदे होऊनही बेदाणा खरेदीला (Raisin Procurement) ऐनवेळी नकार देणाऱ्या प्रकाराची राज्याचे उपसंचालक (पणन) अविनाश देशमुख यांनी दखल घेतली आहे. या प्रकाराबाबत सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा विक्रीत पासिंगच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून सौदे होऊनही ऐनवेळी बेदाणा नाकारण्याचा अर्थात थेट अडवणुकीचा प्रकार घडतो आहे. याबाबत ‘अॅग्रोवन’ने २५ मार्चच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
काही शेतकऱ्यांनीही गेल्या काही दिवसांपासून याबाबतच्या तक्रारी बाजार समितीसह पणन संचालकांकडे केल्या होत्या. अखेरीस या तक्रारींची दखल घेऊन पणन उपसंचालक देशमुख यांनी तातडीने यासंबंधी एक पत्र काढून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांना हा नेमका प्रकार काय घडला आहे.
खरेदीदार व्यापाऱ्यांकडून हे का होते, पणन कायद्यानुसार एकदा सौदे झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने व्यापाऱ्याला माल नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुण कारवाई करावी आणि त्यासंबंधीचा अहवाल पाठवावा, असेही यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro