Ticker

6/recent/ticker-posts

Pauas : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले

Pauas : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले
गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरूवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती.
Pune Rain News : गेल्या आठवड्यात हवामान विभागाने (Weather Department) पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसापासून पुणे जिल्हयात काही प्रमाणात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

त्यातच सोमवारी (ता.६) पुणे जिल्हयातील अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जिल्हयात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.
गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरूवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती. त्यातच अनेक ठिकाणी पीके काढणीच्या अवस्थेत आली होती.
काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरूवात झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसापासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरूवात झाली. पुणे जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सोमवारी सायंकाळपासून दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली तालुक्यांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मंगळवारीही सकाळपासून

ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असल्याने काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळीब पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचणीत आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे चांगलाच संकटात सापडत आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या