आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चालू महिन्यात क्विंटलमागं १३०० रुपयाने कमी झाले. त्यामुळं भारताची कापूस खंडी आंतरराष्ट्रीय बाजारात ५ ते ७ हजारांनी महाग पडत आहे.
Cotton Rate : मार्च महिन्यात देशातील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढली. याचा दबाव सध्या दरावर आहे. पण हंगामातील एकूण आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळं उद्योगांना कमी कापूस मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या नरमाईचा दबावही जाणवत आहे.
पण देशातील कापूस वापराची वाढलेली क्षमता आणि घटलेल्या उत्पादनाचा कापूस बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत ९० टक्के कापूस विकला होता. पण यंदा मार्चपर्यंत केवळ ५० टक्के कापूस बाजारात आला होता. गेल्या हंगामात मार्चनंतर कापूस दरात मोठी सुधारणा झाली होती.
कापसाने ९ ते १० हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं यंदा देशातील शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, पंजाब आणि हरियाना या महत्वाच्या राज्यांमध्ये आजही जवळपास ४० टक्के कापूस असल्याचे सांगितले जाते.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro